Home Cities जळगाव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे अभिवादन (व्हिडिओ)

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे अभिवादन (व्हिडिओ)

0
35

 

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय  राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे अभिवादन करण्यात आले.

रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून शहरातील सर्व दलित समाजाला व बाबासाहेबांवर प्रेम करणारे अनुयायांनी घरूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे असे आवाहन केले. यावेळी पक्षाचे प्रताप बनसोडे, बबलू शिंदे, संदीप जोहरे, किरण अडकमोल, हरीश शिंदे, दिनेश पाटील, अश्फाक पिंजारी, शंकर आराक, शेखर सोनवणे, नीलू इंगळे, जोशना पाटील, रोहित गायकवाड, सागर गायकवाड, दिनेश जोशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/posts/3413683572084899/

 


Protected Content

Play sound