जळगाव प्रतिनिधी । माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहराउपाध्यक्ष शाम तायडे, ब्लॉक अध्यक्ष नदिम काझी, अनुसुचित जाती विभाग शहराध्यक्ष प्रदिप सोनवणे, युवक शहराध्यक्ष मुजीब पटेल, जगदीश गाढे, पी.जी. पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते