जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक गावात घराच्या दरवाजाचा वापर करण्याच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ व मारहाण करून धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवारी १ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा नशिराबाद पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोकेश गोपाळ सोनवणे (वय-१८) रा. भादली बुद्रुक ता.जि. जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास लोकेश हा त्याच्या घरी असताना दरवाजाचा वापर बाजूने करू नये, असे सांगितले. या कारणावरून लोकेश याला दिनेश सपकाळे, उषा सपकाळे, रोहिणी सपकाळे, वाल्मीक सपकाळे सर्व रा. भादली बुद्रुक ता. जि. जळगाव यांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तसेच एकाने धारदार वस्तूने खांद्यावर व कानावर मारहाण करून गंभीर दुखापात करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या लोकेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात बुधवारी १ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा संशयित आरोपी दिनेश सपकाळे, उषा सपकाळे, रोहिणी सपकाळे, वाल्मीक सपकाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत.