जळगावात ‘चला ज्योतिषवेत्ता घडवू या’ या तीन दिवशीय शिबीराचे आयोजन

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या वतीने जळगाव शहरात ‘चला ज्योतिषवेत्ता घडवू या’ या तीन दिवशीय शिबीराचे आयोजन उद्या शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजीपासून सुरुवात होत आहे. हे शिबिर गिरणा पंपिंग रोडवरील आर्यन इको रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

एकवीसव्या शतकातील ज्योतिष शास्त्राचे महत्व काय आहे. याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील ज्योतिष शास्त्राचे दिग्गज यासाठी उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे ज्योतिष शास्त्रातील विविध प्रकारच्या ८ शाखांमधील हे दिग्गज आहेत तर महाराष्ट्रातील जवळपास ५५ निवडक अभ्यासाक देखील यात सहभागी होणार आहे. रविवारी ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेच्या दरम्यान ४ वर्षे अभ्यास करणाऱ्यांचा गौरवसोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजक श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राचे संचालिका ज्योतिषाचार्य डॉ. ज्योती जोशी यांनी केले आहे.

प्रथमच या पद्धतीच्या कार्यशाळेचे आयोजन जळगाव शहरात होत असून या ठिकाणी अनेक शाखांचे अभ्यासक सहभागी होणार आहे. यासाठी अभिजीत प्रतिष्ठान द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई यांच्या सहकार्य मिळत आहे. यामध्ये ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी तज्ञ ज्योतिषाचे अभ्यासक व तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.

Protected Content