भाजीपाला मार्केट येथून एकाची रिक्षा चोरट्यांनी लांबविली

 

जळगाव प्रतिनिधी । अजिंठा चौफुलीजवळील भाजीपाला मार्केट समोरून एकाची 70 हजार रुपये किमतीची रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल युवराज चौधरी (वय 35) रा. असोदा ता. जि. जळगाव ह.मु. ज्ञानदेवनगर, जुना खेडी रोड जळगाव हे रिक्षा चालक आहे. त्यांच्याकडे रिक्षा क्रमांक ( क्रमांक एमएच 19 व्ही 3688) आहे. या रिक्षाच्या माध्यमातून ते आपला कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान शनिवारी 6 मार्च रोजी सकाळी 5.30 सुमारास अजिंठा चौफुलीजवळील भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी आले. त्यावेळी मार्केटच्या बाहेर असलेल्या रोहिणी स्वीट मार्टच्या बाजूला रिक्षा पार्किंग करून लावली. भाजीपाला घेऊन परत आल्यानंतर गोपाल चौधरी यांना त्यांची रिक्षा जागेवर मिळून आली नाही. इतरत्र परिसरात शोध घेतली तरी देखील मिळून आली नाही. अखेर एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन रिक्षा चोरीप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करत आहे.

 

 

 

 

Protected Content