भुसावळ प्रतिनिधी । भाजप वैद्यकी आघाडीची उत्तर महाराष्ट्र स्तरीय बैठक नुकतीच नाशिक येथील वसंत स्मृती या कार्यालयात झाली. यात सर्व विभागांना सोबत घेऊन वैद्यकीय आघाडीचे संघटन मजबूत करण्याचे आवाहन
डॉ. अजित गोपछडे यांनी केले.
येथील भारतीय जनता पार्टीच्या वसंत स्मृती या कार्यालयात भाजपा वैद्यकीय आघाडीची उत्तर महाराष्ट्रची विभागीय बैठक संपन्न झाली.या बैठकीत आगामी संघटना बांधणी व विविध संघटनात्मक विषयावर चर्चा झाली. बैठकीत सुरवातीला भारतीय संस्कृती नुसार जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तद्नंतर कोराना काळात शहीद झालेल्या सर्व डॉक्टर्स,नर्सेस डेंटिस्ट, फार्मसिस्ट, रेडिओग्राफर, टेक्निशियन आरोग्य सेवक, पँरामेडीकल स्टाफ आणि मेडिकल स्टाफ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या बैठकी मध्ये मा.मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सेवाकार्यवर जनसेवक देवेंद्र या साप्ताहिक विवेकच्या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे आ.चंद्रकांत दादा पाटील प्रदेशाध्यक्ष भाजप महाराष्ट्र प्रदेश व देवेन्द्र फडणवीस विरोधीपक्ष नेते व आ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात विभागवार टीमवर्क ने कोविड संकटकाळात केलेल्या सेवाकार्याचे EBOOK चे विमोचन व वाटप करण्यात आले.
तसेच भाजपा वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून कोरोना काळात नाशिक मध्ये सेवा देणाऱ्या प्रथितयश डॉक्टर्स कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
ही बैठक डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पार पडली. या बैठकीला उत्तर महाराष्ट्राचे संयोजक डॉ प्रशांत पाटील यांनी प्रस्तावना मांडली. याप्रसंगी नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे उपस्थित होते. होमिओपॅथी विंगचे संयोजक डॉ. भालचंद्र ठाकरे, शहर संयोजक डॉ. चंद्रशेखर नामपूरकर , डॉ. श्रीराम भतवाल, डॉ. नितू पाटील, डॉ. योगेश पाटील, डॉ. अनिल महाजन, प्रदेश सह संयोजक पॅरा मेडिकल विंग विलास भदाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
वैद्यकीय आघाडीच्या संघटनात्मक रचना व डॉक्टरांच्या विविध मागण्या व समस्या यावर संवादात्मक चर्चा झाली व नूतन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याबैठकीत बोलताना डॉक्टर मंडळींनी राजकारणात यावे व आपल्या समस्या व मागण्या या संदर्भात भाजप वैद्यकीय आघाडीवरील संघटन निर्माण करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन व संवाद साधण्यात आला.
या प्रसंगी सर्व वैद्यकीय आघाडीचे जिल्हा संयोजक व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सूत्र संचालन प्रदेश सह संयोजक पॅरा मेडिकल विंग विलास भदाणे यांनी केले.