जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्ष महानगरच्या उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी शक्ती पॉलिमर्सचे संचालक संतोष महिपत इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झालेली असून आता महानगरच्या अंतर्गत विविध आघाड्यांच्या अध्यक्ष निवड घोषित करण्यात येत आहे. या अनुषंगाने उद्योग आघाडीच्या अध्यक्ष पदी उद्योजक संतोष महीपत इंगळे यांची अध्यक्ष पदी जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी यांची निवड नुकतीच जाहीर केली आहे. संतोष इंगळे यांचे शिक्षण बी.कॉम डी.टी.एल. असून १९८८ पासून त्यांनी जळगाव एम.आय.डी.सी. एथे १९८८ ते १९९८ या कालावधीत एमआयडीसीमध्ये नोकरीला होते १९९९ त्यांनी चटई व्यवसायात पदार्पण करून शक्ती पॉलीमर्स हे युनिट सुरू केले. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून ते चटई उत्पादन असोसिएशनचे माजी सचिव व उपाध्यक्ष तसेच खानदेश माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुद्धा त्यांनी काम केले आहे. ते धनदाई फाउंडेशनचे सचिव असून तसेच म.न.पा. प्रभाग समिती क्रमांक २ चे सदस्य म्हणून निवड झालेली आहेत. ते भारत विकास परिषदचे पदाधिकारी सुद्धा आहे. तसेच संतोष इंगळे हे भारतीय जनता पार्टी चे गेल्या १० वर्षापासून सक्रीय सदस्य म्हणून काम कारत असून पक्षाचे उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे उल्लेखनीय काम असल्याने त्यांची भाजप जिल्हा महान्गाराच्या जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
संतोष इंगळे यांच्या या निवडीबद्दल माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री.अॅड. किशोर काळकर, आमदार राजूमामा भोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे, खा. उन्मेषदादा पाटील, खा.रक्षाताई खडसे, बेटी बचाव बेटी पढाव डॉ. राजेंद्र फडके, आमदार स्मिता ताई वाघ, आमदार चंदू भाई पटेल, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, महापौर भारती ताई सोनवणे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी सभापती सुचिता हाडा, तसेच लघु उद्योग भरतीचे सचिव समीर साने.अध्यक्ष किशोर धाके,म उपाध्यक्ष रवींद्र फालक, किरण जोशी, विजय वानखेडे यांनी आभिनंदन केले आहे.
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००