भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सावदा व पिंप्राळ्यात सभा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे  जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांची सावदा आणि  पिंप्राळ्यात सभा होणार आहे.

 

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात दौरा सुरू आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला  ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोदी ९ जनसंपर्क अभियाना’ अंतर्गत ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. या अनुषंगाने आमदार बावनकुळे यांची ३ जुलै सोमवार रोजी दुपारी २ वाजता रावेर लोकसभा क्षेत्राची जाहीर सभा कलसूमबाई अख्तर हुसेन मंगल कार्यालय  सावदा येथे होणार आहे.

 

दरम्यान, यानंतर जळगाव लोकसभा क्षेत्राची जाहीर सभा सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंप्राळा जळगाव येथे होणार आहे. या सभेला प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री ना गिरीश भाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष तथा शहराचे आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे,  आ. संजय सावकारे, आ मंगेश चव्हाण, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, चिटणीस अजय भोळे, लोकसभा निवडणुक प्रमुख नंदू महाजन व डॉ राधेश्याम चौधरी तसेच जिल्ह्यातील सर्व भाजपा लोक प्रतिनिधि पदाधाकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सभेला मोठ्या संख्येन उपस्थितीत राहण्याचे आवाहन सरचिटणीस सचीन पानपाटील, विशाल त्रिपाठी, मधुकर काटे, हर्षल पाटील, महेश जोशी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर व  गणेश माळी यांनी केले आहे.

Protected Content