मुंडेंना मंत्रीपद नाकारले; चाळीसगावातील पदाधिकार्‍याचा राजीनामा !

चाळीसगाव प्रतिनिधी | खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप पदाधिकार्‍यांनी राजीनामा देण्याचे लोण आता जळगाव जिल्ह्यात पोहचले आहे. चाळीसगावातील मुंडेंचे समर्थक तालुका युवा मोर्चा सरचिटणीस सागर मुंडे यांनी राजीनामा दिल्याने आता अन्य पदाधिकारी याचा कित्ता गिरवणार का ? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

डॉ. प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे पंकजा मुंडे व  प्रीतम मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून सागर मुंडे यांनी चाळीसगाव तालुका युवा मोर्चा चिटणीस पदाचा राजीनामा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना दिला आहे.  सागर मुंडे यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे की,   ज्यांनी वाईट काळामध्ये संघर्ष करून पक्ष वाढविला असे स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे वारसदार म्हणून संपूर्ण राज्यभरात परिचित असलेले पंकजा व प्रीतम मुंडे  यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाणून-बुजून डावलण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.

 

Protected Content