भाजपाचे वरणगावमध्ये चक्काजाम आंदोलन

 

 

वरणगाव  : प्रतिनिधी । आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ आज    भाजपकडून वरणगावमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले

 

काल विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी वरणगाव यांच्यावतीने वरणगाव येथील बस स्टँड चौकामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले

 

माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली वरणगाव येथील बस स्टॅन्ड चौकामध्ये रस्ता रोको करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी  आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली बारा आमदारांचे  निलंबन  तात्काळ रद्द करा अशा  घोषणा या वेळी देण्यात आल्या यावेळी काही काळ बस स्टॅन्ड चौकामध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती

 

 

Protected Content