जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल तसेच स्रीया यांच्याविषयी अपशब्द बोलणाऱ्या भाजपचे खासदार व केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे व महाराष्ट्राचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा जळगाव जिल्हा एन एस यु आय व शहर काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त केला गेला.
एका सभेमध्ये भाजपचे खासदार हेडगे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेली चळवळ आंदोलन व सत्याग्रह हे निव्वळ नाटक होते असे वादग्रस्त विधान केले होते महात्मा गांधींना संपूर्ण देश चांगल्याप्रकारे ओळखतो महात्मा गांधींनी देशासाठी काय केले आहे हे संपूर्ण भारताला माहिती आहे. या उलट स्वातंत्र्य चळवळीमध्ये आरएसएसने पळ काढून ब्रिटिशांना शरण गेले होते तसेच भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यापासून मागे सरकलेल्या व ध्वज स्वीकारण्यास नकार दिलेल्या आरएसएसने नेहमीच संघर्षापासून स्वतःचे अंग चोरण्याचा प्रयत्न केला आहे. हा पण इतिहास देशाला माहिती आहे. त्यामुळे या मोदी भक्तांच्या विधानाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला नेहमी परस्त्री ही आपल्या मातेसमान असते अशी शिकवण दिली आहे परंतु दुर्दैव असे की आज याच महाराष्ट्र राज्यात राज्याचा माजी मंत्री बबनराव लोणीकर मोर्चासाठी गर्दी जमवण्यासाठी एखाद्या सुंदर हिरोईनला आणु अन्यथा तहसिलदारपदी असलेल्या स्त्रि अधिकारी आहेच असे बेताल वक्तव्य केले त्याबद्दल लोणीकर यांचा जाहीर निषेध श्री ही आपल्या मातेसमान व आपल्या भगिनी समान असते परंतु जणू याचाच विसर लोणीकर यांना पडला असावा परंतु ते लक्षात आणून देण्यासाठी जळगाव जिल्हा तर्फे लोणीकर यांना जिल्हाबंदी करण्यात येत आहे व ते जिल्ह्यात आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासले शिवाय राहणार नाही असा इशारा जळगाव जिल्हा तर्फे दिला जात आहे.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, ब्लॉक अध्यक्ष नदीम काझी, युवक अध्यक्ष मुजीब पटेल, विभाग समन्वयक डॉक्टर शोएब पटेल, प्रदेश सचिव बाबा देशमुख अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद पठाण, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे, जमील शेख, झाकीर पठाण, मनोज चौधरी आदी उपस्थित होते.