जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशाच्या १५ व्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने शहरातील तहसील कार्यालय व शहर पोलीस स्टेशन शासकीय कार्यालय येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा देऊन अनावरण करण्यात आले.
भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदी इतिहासात प्रथमच आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू ह्या विराजमान झाल्या आहेत.त्यांची प्रतिमा शासकीय कार्यालयास भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हातर्फे भेट देण्यात आली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. तर यावेळी सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सचिन पानपाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, रेखा कुलकर्णी, महेश चौधरी, राहुल वाघ, धीरज वर्मा, प्रकाश पंडित, सुभाष तात्या शौचे, मंडळ अध्यक्ष शक्ति महाजन, अजित राणे, नगरसेवक गायत्री राणे, सुरेखा तायडे, अतुल बारी, महिला मोर्चा अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, शोभा कुलकर्णी, सरोज पाठक, ज्योती राजपूत, आनंद सपकाळे, प्रल्हाद सोनवणे, मंगेश जुनागडे, स्वप्निल साखळीकर, मिलिंद चौधरी, राहुल मिस्त्री, सचिन बाविस्कर, स्वामी पोतदार, रोहित सोनवणे, सागर जाधव, राहुल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.