मुंबई प्रतिनिधी । भाजप आज तिसर्या उमेदवाराची घोषणा करणार असून यासाठी माजी आमदार एकनाथराव खडसे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत. या अनुषंगाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कालच पक्षाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान संख्याबळानुसार भाजपचे तीन, राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतात. या पार्श्वभूमिवर, आज पक्षाचे तिसरे तिकिट जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाही जाहीर होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रीमंडळात बढती द्यावयाची असेल तर त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर होऊ शकते. तर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हेदेखील तिकिटाच्या स्पर्धेत आहेत.