भाऊसाहेब राऊत विद्यालयात युवा सप्ताह अंतर्गत व्याख्यान

 

जळगाव, प्रतिनिधी । युवा सप्ताह अंतर्गत भाऊसाहेब राऊत विद्यालयात सोमवारी स्वामी विवेकानंद यांचे विचार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव आयोजित दि. १२ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजित युवा सप्ताह अंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा मार्गदर्शक एल. एस. तायडे, पर्यवेक्षक एस. एम. रायसिंग, ए. एस. बाविस्कर, वंदना बलसाने यांची उपस्थिती होती. आजचा युवक उद्याचा भाग्यविधाता व स्वामी विवेकानंद यांचे विचार याविषयावर विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा मार्गदर्शक एल. एस. तायडे यांनी विविध उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार सुवर्णसिंग राजपूत यांनी मानले. कार्यक्रमास सुरक्षित अंतरासह व शासनाच्या एस.ओ.पी.चे पालन करीत विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद यांची उपस्थिती होती.

Protected Content