जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरून तलाव परिसरात असलेल्या ट्रॅकवर भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने पादचारी व्यक्तीला मागून जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाहतुकीसाठी सुरक्षीत समजला जाणारा मेहरुण ट्रॅकवर मॉर्निंग वॉकचा आनंद घेणाऱ्या नेहरू नगर येथील रहिवासी व नुकतेच पाटबंधारे विभागातुन सेवानिवृत्त झालेले शाखा अभियंता हिरामणराव चव्हाण यांना मागुण आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामध्ये पादचारी जखमी झाले असून धडक देणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वारावर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. हिरामण चव्हाण हे आपल्या दैनंदिनी प्रमाणे शहरातील सुपरिचित मेहरूण ट्रॅकवर माॅर्निग वाॅक करत होते. तितक्यात मागुन आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार अपघातस्थळी न थांबता तो शहराच्या दिशेने निघून गेला. या अपघातात हिरामण चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.