जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दावाखान्यात जाण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याचा दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने मागून जोरदार धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील मराठा मटन हॉटेल समोर रविवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, राधिका स्वप्निल उपाध्याय वय 30 रा. पाळधी ता. धरणगाव या आपल्या पती व मुलीसह वास्तव्याला आहेत. राधिका उपाध्याय ह्या पती व मुलगी यांच्यासोबत त्यांची दुचाकी (एमएच १५ जीएच ८४८६) ने दवाखान्यात जाण्याकामी रविवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरात येत असताना राष्ट्रीय महामार्गावरील मराठा मटन मार्केटसमोर भरधाव वेगाने येणारी बस क्रमांक (एमएच ४० एन ९६४०) ने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत राधिका उपाध्याय या जखमी झाल्या आहेत तर वाहनाचे देखील नुकसान झाले. या संदर्भात रात्री १०.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बसचालक ज्ञानेश्वर पांडुरंग देशमुख रा. एम.जे. कॉलेज समोर, सिद्धार्थ नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशील पाटील करीत आहे.