भरधाव दुचाकी सुचना फलकावर आदळल्याने तरूण जागीच ठार; दोन जण गंभीर जखमी

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाडगाव ते मुक्ताईनगर रोडवरील हिंगोणा फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रिपल सीट दुचाकी रस्त्यावरील सुचना फलकावर आदळल्याने दुचाकीस्वार जागीच ठार तर इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद भास्कर लुटे (वय-३५) रा. राजूर ता.बोदवड जि.जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार १९ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शरद भास्कर लुटे हा तरूण त्याचे मित्र प्रशांत मोहन चौधरी (वय-३५) आणि प्रविण भास्कर लुटे (वय-३०) असे तिघेजण दुचाकीने नाडगाव ते मुक्ताईनगर दरम्यान असलेल्या हिंगणेफाट्याजवळून जात असतांना चालक शरद लुटे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावरील सुचना फलकावर दुचाकी आदळली. या अपघातात शरद लुटे हा जागीच ठार झाला तर सोबत असलेला भाऊ प्रविण लुटे आणि मित्र प्रशांत चौधरी हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन चौधरी करीत आहे.

Protected Content