चाळीसगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चुकीच्या मार्गाने येवून अज्ञात दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना धुळे ते चाळीसगाव रस्त्यावरील राजस्थानी चौधरी ढाब्याजवळ घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात दुचकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रशांत ज्ञानोबा कुणकुरे (वय-३४) रा. नेताजी चौक चाळीसगाव हे आपल्या कुटुंबियासह वस्तव्याला आहे. चाळीसगाव तहसील कार्यालयातील महसूल विभागात नोकरीला आहे. सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास प्रशांत कुणकुरे हे त्यांच्या दुचाकीवरून धुळे ते चाळीसगाव रस्त्यावरील राजस्थानी चौधरी ढाबा जवळून जात होते. त्यावेळी समोरून (एमएच १९ डीए २४९५) या दुचाकीवरी अज्ञात चालकाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चुकीच्या मार्गाने येवून प्रशांत कुणकुरे यांच्या दुचाकीचा जोरदार धडक दिली. या धडकेत प्रशांत कुणकुरे यांना गंभीर दुखापत झाली. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून (एमएच १९ डीए २४९५) दुचाकीवरील अज्ञात दुचाकीस्वारावर रात्री ९ वाजता चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईकम जयंत सपकाळे करीत आहे.