भडगाव येथे संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे धरणे आंदोलन

bhadgaon

भडगाव, प्रतिनिधी | संविधान बचाव देश बचाव सी.ए.ए., एन.पी.आर. व एन.आर.सी. रद्द करण्यासाठी आज भडगांव येथे संविधान बचाव नागरी कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जवळपास अडीच ते तीन हजार लोक उपस्थित होते.

 

शुक्रवार (दि.१७) रोजी दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यंत येथील तहसिल कार्यालय आवारात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सी.ए.ए.,एन.पी.आर. व एन.आर.सी.) केंद्र शासनाने त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या धरणे आंदोलनात सर्व जाती-धर्माचे लोक अनेक संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या धरणे आंदोलनाप्रसंगी सिद्धार्थ सोनवणे- वंचीत बहुजन आघाडी, सुनील शिंदे- प्रागतिक विचार मंच पाचोरा, प्रदीप पवार- कॉग्रेस पार्टी, खलील देशमुख, हाजी जाकीर कुरेशी- भारत मुक्ती मोर्चा, विनोद अडकमोल- बहुजन मुक्ती पार्टी, योजनाताई पाटील-ता. अध्यक्ष राष्ट्रवादी महीला आघाडी, इम्रानअली सैय्यद, शेख मोहसिन मुनाफ, विक्रम सोनवणे, हाजी अलता फ शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान यावेळी संविधान जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, भारत जिंदाबाद या घोषणांनी तब्बल तीन तास आंदोलनस्थळ दणाणुन सोडले होते. तिरंगा ध्वज व लहान मुलांच्या हातात असलेल्या भारतातील थोर पुरुषांच्या प्रतिमा यावेळी आकर्षण ठरल्या. या धरणे आंदोलन प्रसंगी महिला, पुरुष, वृद्ध व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसिलदार माधुरी आंधळे यांनी निवेदने स्वीकारले.

Protected Content