भडगाव येथे गट शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षकांकडून मागण्यांचे निवेदन

bhadagaon

 

भडगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक आणि क.म.वि. शाळा कृती संघटनेच्या वतीने गेल्या १९-२० वर्षांपासून विनावेतन सेवा देणाऱ्या उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आज पंचायत समिती भ. येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

शासनाने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी मंजूर केलेल्या तसेच घोषीत केलेल्या प्रचलित धोरणानुसार तात्काळ विनावेतन कार्य करणाऱ्या शिक्षकांचा पगार सुरु करावा, नाही तर आगामी शालेय तसेच मंडळाच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयाप्रत शिक्षक पोहोचणार आहेत. यासंदर्भातील निवेदन आज विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. शासनाने लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आम्हाला नाईलाजास्तव मोठी आंदोलने करावी लागतील असा इशारा संघटनेच्या वतीने निवेदनात करण्यात आला आहे.

यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव तालुक्यातील आठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी संयुक्तारित्या निवेदन अधिकाऱ्यांना सादर केले. निवेदन देते वेळी प्रा.प्रशांत पाटील, प्रा.तायडे, प्रा.कापुरे, प्रा.प्रेमचंद चौधरी, प्रा.एम.एस.पाटील आदि शिक्षक उपस्थित होते.

Protected Content