भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेचा कारण नसतांना विनयभंग केला तर तिच्या पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की. भडगाव तालुक्यातील एका गावात ४४ वर्षीय महिला ह्या आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. दरम्यान काही कारण नसताना ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता गावात राहणारे इंदल पोलाद राठोड आणि मुकेश इंदल राठोड यांनी महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी महिलेचे पतीला देखील बेदम मारहाण करून शिवीगाळ केली व दमदाटी केली. याप्रकरणी महिलेने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी इंदल पोलाद राठोड आणि मुकेश इंदल राठोड यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हिरालाल नारायण पाटील करीत आहे.