भडगावात भाजपाचे ठिय्या आंदोलन, तहसिलदारांना निवेदन

 

भडगावः प्रतिनिधी । भडगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसीं आरक्षणासाठी आज तहसिल चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 

आंदोलनकर्त्यांकडून निवासी नायब तहशिलदार रमेश देवकर यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात ओबीसी आरक्षणात समाविष्ट समाज घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका यातील राजकीय आरक्षण ठाकरे सरकारच्या दुर्लक्षामुळे रद्द झाले. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे व चुकीच्या भूमिकेचा फटका महाराष्ट्रातील तमाम ओबीसीं समाजाला बसला असून राजकीय आरक्षणापासून समाज वंचित झाला आहे. ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार निंदनीय असून ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलावीत यासाठी आज भडगाव येथे भाजपच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 

 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, नाभिक समाज अध्यक्ष संजय पवार, महात्मा फुले बहुउद्देशिय संस्थेचे भिकन महाजन, कौतिक महाजन, गोरख महाजन, माळी समाज पंच मंडळाचे प्रकाश महाजन, कुणबी समाज उत्कर्ष मंडळ उपाध्यक्ष सचिन पाटील, कासार समाज अध्यक्ष संजय कासार, लाडशाखिय वाणी समाजाचे महेंद्र ततार, तेली समाज युवा तालुका अध्यक्ष विशाल चौधरी, शहर अध्यक्ष राहूल चौधरी, शिंपी समाजाचे किरण शिंपी, सोनार समाजाचे अमोल सोनार, सुतार समाजाचे विनोद हिरे, तालुका सरचिटणीस अनिल पाटील, महिला आघाडी अध्यक्ष नूतन पाटील, नितीन महाजन, नकुल पाटील, प्रदिप कोळी, राहूल पाटील, सुर्यभान वाघ, शेखर बच्छाव, वैद्यकीय आघाडीचे डॉ. शेखर पाटील, दत्तात्रय पाटील, हिरामण बाविस्कर, बन्सी परदेशी, अनिल महाजन, अशोक पाटील, प्रमोद पाटील, धोंडू मोरे ( फौजी), सुभाष ठाकरे, निलेश महाले, मनोज चौधरी, विनोद पाटील, मनोहर चौधरी, शांतीलाल पाटील उपस्थित होते.

 

Protected Content