भडगाव प्रतिनिधी । शहरातील विवेकानंद नगर भागातील जिल्हा परीषद शिक्षक ईश्वर लोटन पाटील यांच्या रहात्या घरात दुपारी अज्ञात चोरट्यांनी साडेतीन तोळे सोन्याच्या बांगडया व दिड लाख रोख रक्कम चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे.
याबाबत वृत्त असे की, भडगाव शहरातील विवेकानंद नगर भागातील रहिवाशी जि. प. शिक्षक
ईश्वर लोटन पाटील हे कुटुंबासह लग्ना निमित्त सकाळी बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा साडेतीन वाजेच्या सुमारास घराचा समोरील दरवाजा तोडुन घरामध्ये प्रवेश करीत घरातील बेडरूम मधील सामान अस्ता-व्यस्त फेकुन शोकेस मधील साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगडया, वरच्या बेडरुम मधील कपाटातील तिजोरीतुन दीड लाख रुपये रोख रक्कम चोरुन चोरट्यांनी पोबारा केला. हा प्रकार शिक्षक ईश्वर लोटन पाटील हे घरी आल्यावर उघडकीस आला आहे.
याबाबत पुढील तपास भडगाव पोलिस करीत आहे. घटनास्थळी भडगांव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर, पोलीस.उपनिरीक्षक आनंद पठारे, सुशिल सोनवणे पोलीस हेड कॉस्टेबल प्रल्हाद शिंदे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, स्वप्नील पाटील यांनी भेट देत घटनास्थळाची पहाणी करून सदर घटनेच्या तपासा कामी श्वान पथकास पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या भरदिवसा चोरीच्या घटने नंतर पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या समोर चोरट्यांनचा शोध लावण्याचे मोठे आव्हान ऊभे ठाकले आहे.
शहरातील बाळदरोड विवेकानंद नगर भाग हा सुशिक्षित व उच्चभ्रू लोकांनची कॉलनी म्हणुन ओळखली जाते. त्याच कॉलनीत भरदिवसा एवढी मोठी चोरीची घटना घडली आहे. छोटया मोठ्या भुरटया चोर्या तर नेहमी होतच असतात. पण त्या आरोपींचा शोध लागतच नाही. पण या बाळद रोड भागात झालेल्या मोठ्या चोरीबाबत आता तरी आरोपीचा शोध भडगांव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर व त्याचे पोलीस लावतील का? शहरासह तालुक्यातील चोरट्यांना आळा बसेल का? असे शहरासह तालुक्यातील सुज्ञ नागरीकांन कडुन बोलले जात आहे.