चोपडा, प्रतिनिधी । भगवान बलराम यांना भारतीय किसान संघ शक्ती व मेहनतीचे द्योतक समजत असल्याने भाद्रपद शुध्द शष्ठी या त्यांच्या जयंती दिनी त्यांचे पुजन करुन किसान बांधवांना त्या निमित्ताने नविन उर्जा मिळण्यासाठी प्रार्थना करीत असतो. यंदा किसानांच्या कसोटीचा काळ सुरु आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी, कोरोनावर मात करण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठलदास गुजराथी यांनी येथे केले.
चोपडा कसबे वि.का.सोसायटीच्या सभागृहात भारतीय किसान संघाच्या शाखेतर्फे कृषक देवता भगवान बलराम यांच्या जयंती निमित्ताने भगवान बलराम यांच्या प्रतिमेचे पुजन किसान संघाचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठलदास छगनलाल गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते गोविंदराव मराठे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. याप्रसंगी भारतीय किसान संघाच्या शाखाध्यक्षा कविता वाणी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत नेवे, मंत्री भगवान न्हायदे, पदाधिकारी भानूदास पाटील, रा.स्व.संघाचे उल्हास गुजराथी, हेमंत वाणी, तालुका युवा प्रमुख राहूल महाजन आदि उपस्थित होते. आभार कविता वाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेंद्र महाजन,राजेश बडगुजर, मोतीलाल सोनार यांनी कामकाज पहिले.