जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उद्योग करायचा असेल तर त्यात आपला इंटरेस्ट असणे खूप महत्त्वाचा असते. इतरांची कॉपी करून तो होत नसतो. याचे उत्कृष्ट उदाहरण देऊन त्यांनी सांगितले. एक चांगला लीडर तो असतो जो त्याचा वारसा एकाकडून दुसर्याला देतो. पॉलिटिकल, सोशल, झिनेस यांच्या माध्यमातून वारसदार तयार करणे गरजेचे असते.तसेच त्यांनी अमेरिकेतील निवड प्रणाली व भारतात सध्या परिस्थितीत असलेली प्रणाली यामधील फरक समजावून सांगितला.्रेन, बॉडी आणि माईंड हे सध्याच्या युगातील प्रॉडक्ट आहे त्यांना नेहमी कार्यरत ठेवणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन अमेरीकेचे उद्योजक प्रमोद अत्तरदे यांनी आज जळगावात केले.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. अत्तरदे यांची न्यू जर्सी येथील एडिसन शहरात कॉर्पोरेशन मध्ये कॉर्पोरेटर म्हणून भरघोस मतांनी निवड झालेली आहे.अमेरिकेतील रोजगार संधी व नवीन तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. निळकंठ फालक होते तसेच विशेष अतिथी म्हणून गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील हे उपस्थित होते. व्यासपीठावर पुरुषोत्तम पिंपळे, कृष्णाजी खडसे, ंडू दादा काळे, सौ. नीता वराडे डॉ. ज्योती महाजन, सौ. निला चौधरी,अॅड. प्रवीणचंद्र जंगले, अनुवा अत्तरदे तसेच सकल लेवा पाटीदार मंडळे यांच्या माध्यमातून मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अरुण बोरोले यांनी प्रास्ताविकात संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आयोजनाद्दल माहिती दिली. प्रमोद अत्तरदे यांची न्यू जर्सी येथील एडिसन शहरात कॉर्पोरेशन मध्ये कॉर्पोरेटर म्हणून निवड झाली या निमित्ताने हा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे आयोजन सकल लेवा पाटीदार मंडळे, जळगाव शहर यांच्या माध्यमातून करण्यात आले.सत्कारमूर्ती प्रमोद अत्तरदे यांचा सत्कार गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
अत्तरदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात अमेरिकेमध्ये उद्योग धंद्यांना असलेले अनुकूल वातावरण तसेच बदलत्या काळानुसार तेथील रोजगार संधी, तिथे येणारे तंत्रज्ञान, जागतिक बाजारपेठ, भारतातील सद्यस्थिती आणि त्याचे सामाजिक पडसाद या विषयांवर ते मार्गदर्शन केले.अमेरिकेत चालवित असलेल्या अत्तरदे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असलेले उपक्रम यावरही त्यांनी प्रकाश टाकला.त्यानंतर त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन करताना खानदेशातील विद्यार्थ्यांना परदेशात संधी कशा पद्धतीने मिळवून देता येतील, यासाठी प्रमोद अत्तरदे हे आपल्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. व त्यांच्या संगनमताने एक कोऑर्डिनेशन सेंटर जे विद्यार्थ्यांना परदेशात यशस्वी होण्यासाठी मदत करेल असे मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे. या कार्यासाठी गोदावरी फाउंडेशन नेहमी अग्रेसर असेल असे नमूद केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री निळकंठ फालक यांनी अत्तरदे यांचे कौतुक करताना सांगितले की एक भारतातील व्यक्ती परदेशातील राजकारणात यशस्वी होतो त्याबद्दल संपूर्ण समाजाला अभिमान आणि गर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पाटील व आभार प्रदर्शन प्रा. हेमंत इंगळे यांनी केले.