ब्रेकींग : वादळी वाऱ्यामुळे कंटेनर पलटी; दोघांचा दबून मृत्यू, एक जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवकाळी आलेल्या जोराच्या वादळामुळे उभा कंटेनर पलटी झाल्याने आडोश्याला उभे असलेल्या दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी गुरूवारी २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

भोला श्रीकुसूम पटेल रा. सानीकावा जि. सिवान बिहार आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२) रा.चाळीसगाव ह.मु. पुणे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नावे आहे.

जळगाव तालुक्यातील चिंचाली गावाजवळ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकाचा कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून गेल्या जानेवारीपासून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या ठिकाणी काही बिहार राज्यातील मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहे. गुरूवारी २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अवकाळी वादळ सुरू झाले. आलेल्या मोठ्या वादळापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतू वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड देखील उडाली. त्यामुळे शेडमधील मजूर हे पटांगणात उभा असलेल्या कंटेनरच्या बाजूला आडोसा घेतला. दरम्यान, सुसाट वेगाने सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे कंटेनर देखील पलटी झाला. या कंटेरनखाली भोला श्रीकुसूम पटेल रा. सानीकावा जि. सिवान बिहार आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२) रा.चाळीसगाव ह.मु. पुणे हे दोघे दाबले गेल्याचे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अफरोज आलम (वय-२३) रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार हा जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मयत भोला हा गेल्या दोन महिन्यांपासून कंत्राटी पध्दतीने कामाला होता. गावातील काही मित्रांसोबत तो कामाला आलेला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. तर चंद्रकांत वाभळे हे इंजिनिअर म्हणून न्याती कंपनीत नोकरीला होते, गेल्या १५ दिवसांपासून या ठिकाणी कामावर हजर झाले होते.

Protected Content