ब्रेकींग : लॉक डाऊन आता १७ मे पर्यंत वाढवला

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ३ मे रोजी लॉकडाऊन संपत असतांना आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राने आज जाहीर केला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. हा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. मात्र याच दिवशी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला होता. यानंतर ३ मे रोजी लॉकडाऊन संपेल की नाही याबाबत संभ्रम असतांना आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. अर्थात आता दोन आठवड्यांचा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.

Protected Content