पारोळा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।पारोळ्याजवळ गॅस सिलिंडरच्या टँकरचा अपघात झाला झाल्याची खळबळजनक घटना शनिवार २० जानेवारी रोजी मध्यरात्री घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व पोलीस घटनास्थळी आहेत. दोन रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्याने आग विझवण्यात आली आहे. या आगीत कोणतेही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे
पारोळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याने गॅस सिलेंडरने भरलेल्या टँकरला भीषण आग झाले लागल्याची घटना शनिवारी २० जानेवारी रोजी मध्यरात्री घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पारोळा येथील तहसीलदार आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच अग्निशमन पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमनच्या बंबाने ही आग आटोक्यात आणण्यात आल्या असल्याचे समजते सिलेंडरने. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम राजकुमार आपत्कालीन प्रतिसादाचे निर्देश देत आहेत. पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील हे घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती घेत आहे