अश्लिल शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मालमत्तेचे प्रकरण कमी पैशात सेटल करून देतो असे सांगून व अश्लिल भाषेत बोलत ३९ वर्षीय महिलेला अश्लिल शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा प्रकार १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील भजे गल्ली येथे घडला आहे. तसेच विवाहितेच्या दिरानीलाही शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी गुरूवारी १८ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबबात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सपना नगरातील एका भागात ३९ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. महिला ही आपल्या दिरानी सोबत १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जळगावातील बहिणीला भेटण्यासाठी जात असताना भजे गल्ली येथे दुचाकीवर आलेला जितेंद्र राणे नामक व्यक्ती महिलेजवळ आला. व म्हणाला, की मालमत्तेचे प्रकरण कमी पैशात सेटल करून देतो. तसेच अश्लिल भाषेत बोलत तिला दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. दिराणी अडवण्यास गेली असता तिला राणे याने शिवीगाळ केली. याप्रकरणी विवाहितेने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जितेंद्र राणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मीरा देशमुख करत आहेत.

Protected Content