जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील एक वृद्ध महिला शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील हा तिसरा कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, एक वृद्ध महिला कोरोना संशयित म्हणून शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. जिल्हा रुग्णालयाने कोरोणा सदृश्य लक्ष नसलेले तिचे नमुने पाठविण्यात आले होते. त्या महिलेचा तपासणी अहवाल आज शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे। निष्पन्न झाले आहे. सदरील महिलेला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी दुजोरा दिला आहे. /p> संबंधीत महिला ही अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील रहिवासी आहे. तिचा मुलगा काही दिवसांपूर्वी पुणे येथून आला होता. त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. यानंतर तिला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिचा स्वॅप नमूना चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. या चाचणीचा रिपोर्ट आता पॉझिटीव्ह आला आहे.