बोदवड येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषांचा तसेच मराठी माणसांचा अपमान करणारे वक्तव्य केले. या वक्तव्याचा  राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बोदवडतर्फे निषेध करण्यात आला.

 

मराठी जणाची वेळोवेळी आपल्या भाषणातून अपमान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा आज रविवार दि. ३१ जुलै रोजी   राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी राज्यपाल गो बॅक  अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील,राष्ट्रवादी महिला पदाधिकारी,कार्यकर्त्यां यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

दरम्यान,राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधातील आंदोलनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन कार्यालयात जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समितीच्या व जिल्हापरिषदेच्या निवडणुका, पक्षबांधणी, सोशल मिडियाचा वापर, पक्ष वाढ अश्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्हापरिषद गटात कार्यकर्त्यांनी करावयाचे काम, तसेच पक्ष बांधणी व नागरिकांच्या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांनी सूचना केल्या.  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. पाटील यांनी केले.

 

Protected Content