बोदवड येथे भाजपातर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन (व्हिडिओ)

बोदवड, सुरेश कोळी । स्व. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबीरात ९० रुग्णांनी सहभाग घेतला. या ने शिबिरात  २२ जणांना डॉक्टरांनी  तारीख आणि वेळ दिली आहे.  यासार्वांवर मोहनराव नारायणा नेत्रालाय नांदुरा येथें  शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

 

 

 

नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात स्व. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी खासदार रक्षाताई खडसे व अशोक कांड़ेलकर, नंदू महाजन, व स्थानिक पदाधिकारी या सगळ्यांनी प्रतिमेस अभिवादन केले. तर तालुका सरचिटणीस अमोल देशमुख यांनी स्व. पंडितजींच्या कृतिरुप विचारावर प्रकाश  टाकला. अमोल देशमुख यांनी आगामी नगरपंचायतनिवडणुकीत  भाजापाचा कुठला ही उमेदवार जातीच धृयीकरणं होऊ न देता अंत्योयदय या विचाराला घेऊन सामोरे जाईल. बोदवड शहर आर्थिक दृष्ट्या मागसलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या नगर पंचायती  निवडणूकीत भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर  योजना स्व. पंडित दीनदयाल सूर्योदय योजना अंतर्गत बोदवड शहरात स्थानिक वास्तव्य करणाऱ्याना सव्वाशे युनिट वीज बिल निशुल्क करण्यात येईल असे जाहीर केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/155287143459982

 

Protected Content