बोदवड, प्रतिनिधी | येथील पंचायत समितीत आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकाला नाहक विविध विभात चकरा माराव्या लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटविल्या जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्वात लहान पंचायत समिती म्हणून बोदवडची गनना केली जाते. यात जिल्हा परिषद सदस्य दोन व चार पंचायत समिती असे स्वरूप असून मिनी मंत्रालय म्हणून पंचायत समितीचा उल्लेख केला जाते. दरम्यान या ठिकाणी खेड्यापाड्यातून नागरिक आपल्या समस्या घेऊन येत असतात. परंतु आल्यावर ब-याचदा या कक्षातून त्या कक्षात फिरावं लागतं . कर्मचारी दुसऱ्या कक्षात असणे हां अनुभव लोकांसाठी नित्यनेयमाचा झाला आहे . त्यामुळे नागरिकांचा विनाकारण खोळंबा होतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेवर बसावे असे जिथे काम , तिथे थांब ! सामान्य प्रशासनाने आदेश काढून सुद्धा त्या आदेशाला बोदवड पंचायत समितीचे कर्मचारी केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे . बोदवड तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी बऱ्याच जागृत नागरिकांनी उपोषण केले. व काही नागरिकांनी लेखी निवेदन सुद्धा दिले आहे. पण याकडे मात्र बोदवड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याचे नागरीकांमध्ये बोलले जात आहे . याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी गटविकास अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येत असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.