बोदवडात ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधीचे घरोघरी मोफत वाटप

बोदवड प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेतला बोदवडातील प्रभाग क्रमांक बारा व नऊ मध्ये नगरसेवक व नगरसेविकेतर्फे परिसरात रोगप्रतिकारक शक्तीवाढविणारे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ व निर्जंतूकीकरण फवारणी करण्यात आली आहे.

बोदवडात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नगरसेवक सुनील बोरसे व नगरसेविका सुशिलाबाई आनंदा पाटील यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १२ आणि ९ या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीवाढविणारे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ व निर्जंतूकीकरण फवारणी करण्यात आली. प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन वाटप करण्यात आली व नागरिकांनी घरातच राहा व तोंडाला मास्क लावण्याचे आव्हान नगरसेवक सुनील बोरसे व सुशिलाबाई आनंदा पाटील यांनी केले.

Protected Content