बोदवडच्या लोकन्यायालयात २५ दावे तडजोडीने निकाली

 

बोदवड : प्रतिनिधी । येथे आज आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात २५ दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले .

या लोकन्यायालयामध्ये बोदवड न्यायालयात प्रलंबीत व  दाखल पूर्व  दावे  तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते .  त्यापैकी

५० दिवाणी  व ७५ फौजदारी  दावे होते . ३  फौजदारी दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले व त्यातून  १६ हजार रुपये  वसुली करण्यात आली

 

बोदवड नगरपंचायत व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या करवसुलीच्या  १४१५ दाव्यांमध्ये   2 लाख ६ हजार ३४७ रुपये  वसुल करण्यात आले . स्टेट बँक ऑफ इंडिया ( शाखा बोदवड व एणगांव), बैंक ऑफ महाराष्ट ( शाखा शेलवड) , सेंटल बँक ऑफ इंडीया ( बोदवड ) या बँकांचे २१५  दाखल पूर्व दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते त्यापैकी  १७ दावे  तडजोडीने निकाली काढण्यात आले आणि १८ लाख ६९ हजार ५९१ रुपये  एवढया रकमेची वसुली करण्यात आली. विज वितरण कंपनीच्या  २१९ प्रलंबीत  दाव्यांपैकी   ५ दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले व  २१ हजार ३८० रुपयांची वसुली

करण्यात आली . आजच्या लोकन्यायालयात इकून  २१ लाख १३ हजार ३१८  रुपयांची वसुली झाली

 

या लोक न्यायालयामध्ये पॅनल प्रमुख म्हणुन भुसावळ न्यायालयातील तिसरे सहदिवाणी न्यायाधीश  के. एस. खंडारे व पॅनल सदस्य बोदवड बार अससोसिएशनचे अध्यक्ष अॅड.अर्जुन टी पाटील  होते.

 

या लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी बोदवड वकील संघाचे सदस्य अॅड. के. एस. इंगळे, अॅड. विजय मंगळकर, अॅड. निलेश लढे,  अॅड.परदेशी, अॅड. ईश्वर पाटील, अॅड. अमोलसिंग पाटील यांच्यासह वकील सहकारी आणि बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, महवितरणचे अधिकारी ,  सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक , बोदवड न्यायालयातील

कर्मचारी  एस.पी.आठवले, व्ही. डब्ल्यु  पाटील, एस. एस. परसे. ए. पी. बावीस्कर, परमेश्वर जाधव, एस. आर. थोरात, एस. के. मानकर, बी. के. सोनवणे, राजु धुंदाळे, योगेश वंजारी यांनी परिश्रम घेतले .

 

Protected Content