चाळीसगाव,प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे येथील १७ वर्षीय तरूणाचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी समोर आली असून पंचनामा करण्यात आला.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील बोढरे येथील अनिल शिवाजी राठोड (वय-१७) या तरूणाचा शिवारातील एकाच्या विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला. अनिल राठोड याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, अगोदरच घरात हलाखीची परिस्थिती असल्याने आई-वडील ऊसतोडीणीचे कामे करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र काळाने त्यांच्यावर घातलेल्या घालामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.