बोढरे गावात कोरोनाचे नियम धाब्यावर !

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग  गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दि.१३ व १४ मार्च रोजी शहरात जनता कर्फ्यू पुकारलेले असताना तालुक्यातील बोढरे गावात आज आठवडा बाजार भरल्याचे दिसून आले. गावात नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहेत.

शहरासह जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि.१३ व १४ मार्च रोजी संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदी लागू असताना तालुक्यातील बोढरे गावात संचारबंदीचे पायमल्ली होत आहे. चक्क आज गावात आठवडा बाजार भरवण्यात आला. यात बाहेरगावाहून भाजीपाला विक्रीसाठी आलेले होते. त्यांनी आपल्या तोंडावर मास्क न लावता बिनधास्त ग्राहकांना विक्री करत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आठवडा बाजार भरवण्यापूर्वी विक्रेत्यांनी परवानगी काढली होती का? काढली होती तर कोणाची असे अनेक प्रश्न सुजाण नागरिक विचारत आहेत.

Protected Content