चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील गोरखपूर तांडा येथून प्रारंभ झालेल्या ” आमदार आपल्या दारी’ अभियानाच्या दुसऱ्या दिवशी बोढरे येथे ग्रामस्थांकडून आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे सदर अभियान यशस्वी झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून ” आमदार आपल्या दारी’ योजनेला तालुक्यातील गोरखपूर तांडा येथून ८ ऑगस्ट रोजी पासून प्रारंभ झाली आहे. भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हि योजना राबविण्यात येत आहेत. दरम्यान सदर अभियानाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील बोढरे येथे आज शिबिर आयोजित करण्यात आले. या अभियानाअंतर्गत ५१ पिवळे कार्ड, ९ केसरी कार्ड, ११६ इश्रम कार्ड, बीपीएल २१५ व ४६ उत्पन्न दाखले आदी ग्रामस्थांना वितरीत करण्यात आले. त्याचबरोबर संजय गांधी निराधार २६, श्रावण बाळचे २५, इंदिरा गांधी विधवा २१ व इंदिरा गांधी वृद्धापकाळच्या ४६ प्रकरणे व रेशनकार्डात नाव वाढविण्यात वा कमी करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांकडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून आमदार मंगेश चव्हाण यांनी जी सुविधा उपलब्ध करून दिली. याबाबत ग्रामस्थांनी यावेळी आभार मानले.
याप्रसंगी मंडळ अधिकारी योगेश सोनवणे, तलाठी गुरव अप्पा, ग्रामसेवक दिपक देवरे, तालुका समन्वयक दिनकर राठोड, अंत्योदय जनसेवा कार्यालयाचे व्यवस्थापक संदीप भावसार, अशोक राठोड, योगेश महाजन, विकी, तालुका उपाध्यक्ष भाजपा विमुक्त आघाडी गुलाब राठोड, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन राठोड, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते देविदास जाधव, शिक्षक वासुदेव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र परदेशी, शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भिमराव जाधव, भाजपाचे ग्रामीण सरचिटणीस अविनाश राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी महेश चव्हाण, वसंत राठोड, निवृत्ती राठोड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.