बोगस लाभार्थ्यांची चौकशी करण्याची मागणी

yaval nivedan

यावल प्रतिनिधी । तालुक्यात संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातुन मागील पाच वर्षात समितीच्या माध्यमातुन अनेक बोगस लाभार्थ्यांची प्रकरणे मंजुर करण्यात आल्याची तक्रार आज लोकशाही दिनाचे औचित्य साधुन यावलचे सामाजीक कार्यकते युवराज समरत सोनवणे यांनी एका लेखी तक्रारीव्दारे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्याकडे केली आहे.

तक्रारकर्ते युवराज समरत सोनवणे यांनी लोकशाही दिनानिमित दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की , यावल तालुक्यात महाराष्ट्र शासना वतीने निराधाराना सामाजीक बांधिलकीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य रूपात मदत देण्यात येते. वर्ष २०१४ ते २०१९च्या या कालावधीत कार्यरत असलेल्या अशासकीय संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातुन काहींनी समितीला हाताशी धरून बर्‍याच लाभार्थ्यांची बोगस प्रकरणे मंजुर केलेली आहेत. तरी या कालावधीत मंजुर झालेल्या लाभार्थ्यांच्या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी यावल येथील सामाजीक कार्यकर्ते युवराज समरत सोनवणे यांनी तहसीलदार जितेद्ध कुवर यांच्याकडे केली आहे.

Protected Content