रावेर प्रतिनिधी । बोगस रेशन कार्ड प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाल्या नंतर याच रॅकेट शोधण्याचे मोठे आव्हान आता रावेर पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी पोलिसांनी तळाशी जाऊन शोध घेत दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.
याबाबत वृत्त असे की, सध्या बोगस रेशन कार्डाचे प्रकरण चर्चेत आहे. स्वस्त धान्य दुकानदार असलेला आरोपी डीगंबर बाविस्कर यांनी तयार केलेले बोगस रेशन कार्डला कोण-कोणाचे आशीवार्द लाभले आहे.याला कोण-कोण जबाबदार आहे. यातला हा सूर्य हा जयद्रथ जनते समोर यावा असा सुर जनतेत आहे. तर या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी देखील अॅक्शन मोडवर असून संबधित स्वस्त धान्य दुकान चालकाचा परवाना रद्द करण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.
केर्हाळा बु येथील रेशन दुकानदार दिगंबर रामचंद्र बाविस्कर यांनी शेत खरेदी करण्यासाठी खोटे रेशन कार्ड तयार करून त्यावर खोटे शिक्के करून शासकीय अधिकारी यांच्या बनावट सह्या असे दस्तऐवज करण्याच्या इराद्याने खोटे दस्तऐवज खरे आहे असे भासवून या बहादुराने लाखो रूपयांची शेती खरेदी केली. हा सर्व प्रकार सामाजिक कार्यकर्ते महेश लोखंडे यांनी समोर आणल्याने याचे बिंग फुटले व फसवणूक केल्याचे सिद्द झाल्यावर रावेर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
अशी लढवली शक्कल
संबधित आरोपीला पोलिस कोठडी सुनावली असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. संशयित आरोपीने बनावट रेशन कार्डच्या आधारे जमीन खरेदी केली असल्याची तक्रार महेशचंद्र लोखंडे यांनी दाखल केली होती. आरोपी हा शेतकरी नसताना त्याने शेती घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याची फिर्यादी यांची तक्रार आहे. शेतीचे बाकीचा खरेदीचा नोंदणीकृत सौदे पावती रद्द मनाई हुकूम साठी रावेर न्यायालयात दाव्यातील बनावट शिधापत्रिकाचे दस्तऐवज पुरावा दाखल करून संशयिताचे बनावट दस्तऐवज तयार करून त्यावर शासकीय अधिकारी यांचे खोटे सिक्के सहीचे बनावट दस्तऐवज करून फसवणुक करण्याच्या इराद्याने खरे आहे असे भासवून त्याचा वापर शासकीय कार्यालयात दस्तऐवज दाखल करून कब्जात ठेवला. अशी फिर्याद कोर्टात दिल्याने न्यायालयाने कलम १५६ ( ३ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याला कोण जबाबदार ?
दरम्यान बोगस रेशन कार्ड याला कसे मिळाले..? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.बोगस रेशन कार्ड देणारे रॅकेट तर सक्रीय नाही असे अनेक प्रश्न यातुन उपस्थित होत आहे.या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करण्याची गरज आहे. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.