रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील केऱ्हाळा येथील स्वस्त धान्य दुकानादार बनावट रेशनकार्ड तयार करून देण्याचे उघडकीला आले होते. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी दुकानाचा परवाना निलंबित केले आहे.
रावेर तालुक्यात बोगस रेशन कार्ड प्रकरण जोरात गाजत आहे. शेती खरेदीसाठी बनावट रेशनकार्ड तयार करून शेती खरेदीसाठी पुरावा म्हणून वापर केला जात होता. हा प्रकार तालुक्यातील केऱ्हाळा येथील रेशन दुकानदार डिगंबर बाविस्कर यांनी केला. याची बातमी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांच्या लक्षात आला त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातील शिक्के ताब्यात घेतले असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी रेशन दुकानाचा परवाना रद्द केला आहे. शेतकरी नसतांना शेती खरेदीसाठी तात्कालीन नायब तहसिलदार व अव्वल कारकुन यांच्या बनावट सह्या व शिक्क्याचा वापर करून बनावट रेशन कार्ड तयार केले होते.
अटी-शर्तीचा भंग केल्याने दुकान सस्पेंड
दरम्यान न्यायालयाच्या आदेशावरुन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी या संदर्भात अहवाल मागविला होता. यात महाराष्ट्र अनुसूचित वस्तु वितरण विनीयमन आदेशातील अटी-शर्तीचा भंग केल्याचे आढळुन आल्याने त्यांचे स्वस्थ धान्य दुकान निलंबित केले आहे.