अनुकंपाधारकांचे तत्काळ नियुक्तीसाठी आमरण उपोषण (व्हिडिओ)

 

जळगाव, राहुल शिरसाळे  । जळगाव महापालिकेत मागील ७ वर्षांपासून प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाली नसल्याचा आरोप करत ही नियुक्ती तत्काळ मिळावी या मागणीसाठी अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील वारसांनी आज सोमवार ८ फेब्रुवारीपासून महापालिकेसमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. 

महापालिकेच्या दप्तर दिरंगाईमुळे अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळत नसून प्रतीक्षा सूचीवरील वारसांचे नोकारीचे वय उलटून गेल्यास त्यांना नोकरीची संधी  गमवावे लागेल. आज अनुकंपा नियुक्तीसंदर्भात सर्व शासन निर्णय, नियम अनुकूल आहेत. तसेच महापालिकेत पदे रिक्त असतांना देखील नियुक्ती मिळत नाही. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी वारसांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. महासभेत अनुकंपाधारकांच्या वारसांना एका महिन्याच्या आत नियुक्ती देण्यात यावेत असा ठराव २००५ मध्ये करण्यात आला होता. मात्र, या ठरावाची देखील अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे. 

असा ही दप्तर दिरंगाईचा फटका

अर्चना उल्हास तायडे या वारसास महापालिकेच्या दप्तर दिरंगाईचा जबर फटका बसला आहे. अर्चना तायडे यांनी २०१४ साली वारसा हक्काने नोकरी मिळावी यासाठी अर्ज सादर केला होता. त्यांची २०१५-१६ मध्ये वैद्यकीय चाचणी देखील घेण्यात आली. मात्र त्यांना, मनपा प्रशासनाने ६ महिन्यांपूर्वी शासनाच्या नियमानुसार त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली असल्याचे पत्र दिले आहे. अर्चना तायडे यांनी वेळेवर प्रक्रिया करून देखील त्यांची काहीएक चुकी नसतांना  महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे.

उपोषणात उदय जैन, प्रसाद पाठक, गजानन मोरे, चेतन सैदाणे, विशाल सुर्वे, किरण देवरे, शुभम कोतकर, मुकेश पाटील, महेश शिंपी, चेतन खोंडे आदी सहभागी झाले आहेत. 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/752841155670541

Protected Content