मुंबई : वृत्तसंस्था । बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी ड्रग्स डिटॉक्ससाठी गोव्यात जातात. शूटिंगसाठी किंवा सुट्टीसाठी ते व्हिला बुक करतात पण मुळात ते डिटॉक्ससाठीच आलेले असतात. सेेलिब्रिटी जाणीवपूर्वक असं करतात जेणेकरून जेव्हा ड्रग्ज टेस्ट होते तेव्हा कोणतेही पुरावे सापडत नाहीत.
सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या गुन्ह्यात अमली पदार्थांच्या वापराची आणि विक्रीची नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरो चौकशी करत आहे. रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर एनसीबी सक्रिय झाली. आतापर्यंत रियासह अनेकांना अटक करण्यात आली. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंग यांचीही चौकशी करण्यात आली चौघांनीही ड्रग्ज घेत असल्याचे नाकारले
बॉलिवूड सेलिब्रिटी गोव्यात ड्रग्ज डिटॉक्ससाठी सातत्याने जातात. शूटिंगसाठी किंवा सुट्टीसाठी ते व्हिला बुक करतात पण मुळात ते डिटॉक्ससाठीच आलेले असतात. सेेलिब्रिटी जाणीवपूर्वक असं करतात जेणेकरून जेव्हा ड्रग्ज टेस्ट होते तेव्हा कोणतेही पुरावे सापडत नाहीत.
एका व्हिलाच्या केअरटेकरने सांगितलं की सेलिब्रिटी शक्यतो एजन्टमार्फत संपर्क करतात. यामुळे सेलिब्रिटींची ओळख बाहेर होऊ नये यासाठीच ते मध्यस्थिची मदत घेतात. एनसीबीच्या चौकशीच्याआधी सारा अली खान, दीपिका पादुकोण आणि करण जोहर कुटुंबासोबत गोव्यात जाऊन आले होते.
एनसीबीने ड्रग्ज लिंकमध्ये रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि क्षितीज प्रसाद यांच्यासह अनेक ड्रग्ज डिलर्सला अटक केली आहे. अनेक मोठे कलाकार एनसीबीच्या रडारवर असल्याच्याही बातम्या आहेत. त्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळताच त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.