Home राज्य बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा निघेना

बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा निघेना

0
41

मुंबई प्रतिनिधी । बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा निघत नसल्यामुळे मुंबईकर जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. दरम्यान, मनसेने या प्रकरणी तमाशा करण्याचा इशारा दिला आहे.

बेस्ट कर्मचार्‍यांचा संप सलग सातव्या दिवशीदेखील सुरू असून यामुळे मुंंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणीदेखील होणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बेस्ट संपावर आज तोडगा निघाला नाही तर मनसे प्रत्यक्ष संपात उतरणार आहे. यामुळे मुंबईतील रस्त्यांवर जो काही तमाशा होईल यासाठी प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound