बेपत्ता झालेल्या तरूणाची दुचाकी आढळली; त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज

जळगाव प्रतिनिधी । खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असलेला तरूण घरून बाहेर जावून येते असे सांगून दुचाकी घेवून बेपत्ता झाला आहे. तरूणाचीह दुचाकी विदगाव तापी नदीजवळ आढळली आहे. मात्र तरूणाने नदीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची शंका बळावली जात आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगरात राहणारा चंद्रकांत शांतारात मराठे (वय-३२) हा तरूण शहरातील स्टेडीयमजवळील भारत इंटरप्राईजे येथे सेल्समन म्हणून कामाला आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता चंद्रकातने आपली दुचाकी क्रमांक (एमएच १९, डब्ल्यू ५८७०) घेवून बाहेर पडला. चंद्रकांत कामाच्या निमित्ताने बाहेर गेला असले असे त्याचे वडील शांताराम मराठे यांना वाटले. मात्र बराच वेळ झाल्याने मुलगा घरी आला नाही म्हणून त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांनी मोठा मुलगा प्रदिप व मुलगी कल्पना यांना याची माहिती दिली. तसेच नातेवाईकांकडेही तपास केला काहीच माहिती मिळाली नसल्याने ३० सप्टेंबर रोजी शांताराम मराठे यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. मुलगा चंद्रकात मराठे हा बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय झाल्टे करीत आहे.

चंद्रकांतची दुचाकी आढळली विदगाव तापी पुलावर
जळगावातून चंद्रकांत हा दुचाकी क्रमांक (एमएच १९, डब्ल्यू ५८७०) घेवून बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान, जळगाव तालुक्यातील विदगाव तापी पुलावर बेपत्ता झालेल्या चंद्रकांतची दुचाकी १ ऑक्टोबर रोजी आढळून आली. मात्र चंद्रकांत तिथे नसल्याचे पोलीसांना माहिती मिळाली. दुचाकी आढळल्याने चंद्रकांतने उडी घेवून आत्महत्या तर केली नाही ना !. असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस कर्मचारी याचा शोध घेत आहे.

त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा पोलीसांची अंदाज
शहरातील स्टेडीयमजवळ चंद्रकांतचे ऑफिस असल्याने दररोज सकाळी १० वाजता घरातून कामावर जातो. मार्च २०२० मध्ये कॉम्प्लेक्स मधील विनोद एजन्सीचे मालक भोईटे आणि टोपीवाला कर्मचारी (पुर्ण नाव माहित नाही) यांनी बदनामी करून लोकांना भडकावित होते. ऑफिससमोर गुंडप्रवृत्तीच्या तरूणांना उभे करून ठेवणे, महिलांशी छेडखानी केल्याची फसवूक करू अशी धमकी देत होते. अशी तक्रार यापुर्वी चंद्रकांत मराठे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या मानसिक त्रासाला कंटाळून चंद्रकांत मराठे यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Protected Content