सावदा प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाओच्या जिल्हा संयोजकपदी सरिता भारत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सावदा येथील सारिका भारत चव्हाण यांची भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाओच्या जिल्हा संयोजकपदी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी नियुक्ती केली आहे. सरिता चव्हाण यांची पक्ष संघटनेतील विविध जबाबदारी तसेच लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याचा तसेच तसेच व्यापक अनुभवाचा उपयोग पक्ष संघटनेच्या कार्यासाठी निश्चितपणे होईल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला आहे. सरीता चव्हाण यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.