जळगाव प्रतिनिधी । शहरातील बेंडाळे चौकात बेवारसरित्या जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या ३५ वर्षीय तरूणाचा आज सकाळी जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मयताची ओळख पटली असून विनोद महेश देवांगण (वय-३५) असे मयत तरूणाचे नाव आहे. मात्र नातेवाईकांचा शोध घेणे सुरू आहे. शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील बेंडाळे चौकांतील रिक्षाच्या थांब्याजवळ गुरूवार ४ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अनोळखी ३५ वर्षीय तरूण बेवारसरित्या पडून होता. त्याला काही रिक्षाचालकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास अनोळखी तरूणाचा मृत्यू झाला. शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आम्ही बातम्या चोरणारे चोर आहोत
सुरूवातीला अनोळखी म्हणून दाखल करण्यात आले होते. यापुर्वी देखील सदरील तरूण रूग्णालयात दाखल होता. त्यानुसार मागील नोंदणी व केसपेपरची शनीपेठ पोलीसांनी चौकशी केली असता त्याचे नाव निष्पन्न झाले. मात्र नातेवाईकांचा शोध घेणे सुरू आहे. ओळखीचे व्यक्ती असल्यास संबंधित व्यक्तीने शनीपेठ पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन शनीपेठ पोलीसांनी केली आहे.