जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये लावलेल्या विकास कामांचे बॅनर अज्ञात समाजकंटकांनी फाडून नुकसान करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन युवासेनाच्यावतीने बुधवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडीच्या वतीने विकास कामे झपाट्याने होत आहे. जळगावात देखील विकास कामांना सुरूवात करण्यात आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील शिवसेनेचे गटनेते तसेच नगरसेवक अनंत जोशी आणि नगरसेवक नितीन बरडे यांनी विकास कामांचे बॅनर लावण्यात आले आहे. काही समाजकंटकांनी लावलेले बॅनर फाडून नुकसान केल्याचे मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आला आहे. बॅनरची नासधूस करून अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे समाजातील विविध राजकीय पक्षांमध्ये तेढ निर्माण करू वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अश्या समाजकंटक आणि गुन्हेगारांना शोधून अटक करावी आणि त्यांच्या गुन्हे दाखल करावे जेणे करून शांततेचा भंग होणार नाही. अशी मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने बुधवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर युवासेना महानगरप्रमुख स्वप्निल परदेशी, विशाल वाणी, मयुर सपकाळे, अमित जगताप, गिरीष सपकाळे संकेत कापसे , अमोल मोरे, तेजस दुसाने यांच्यासह आंदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.