बुलढाण्यात पालकमंत्र्यांनी साधला पत्रकारांशी संवाद

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुलढाण्यातील पत्रकारांशी संवाद साधला.

पालकमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. मात्र बुलढाणा जिल्हा हा ऐतिहासिक, भौगोलिक तसेच धार्मिक स्थळांनी नटलेला असून देशासह जगभरातून पर्यटक पर्यटनासाठी जिल्ह्यात येत असतात. त्यामुळे जिल्ह्यात एक छोटंसं का होईना विमानतळ व्हावं, या मनसेच्या मागणीवर गुलाबराव पाटलांना प्रश्न पत्रकारांनी यावेळी विचारला, तेव्हा बाजूलाच बसलेले बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव मात्र, गालातल्या गालात हस्ताना दिसतात.. खासदार जाधव यांच्या या हसण्याचा व्हिडीओ जिल्हाभरात व्हायरल होत आहे.. एक तर प्रतापराव खासदार असूनही आतापर्यंत त्यांच्या डोक्यात हा विचार आला नसेल किंवा ही मागणी प्रतापरावांना हास्यास्पद वाटली असेल किंवा यावेळी त्यांना हसून काय सांगायचे होते, असाही प्रश्न अनेकांना पडतोय. मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी मनसेच्या या मागणीला समर्थन दिलय, एव्हढे मात्र नक्की…

 

Protected Content