इंदौर येथील आयुर्वेद पंच गव्य चिकीत्सा महोत्सवात मोफत तपासणी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इंदोर येथे मोफत आयुर्वेद पंच गव्य चिकित्सा शिबीर नुकतेच प. पु. आचार्य गुरुवार १०८ श्री. विज्ञासागर जी महाराज यांचे पावन आशीर्वाद व आरयीका रत्न प. पु. १०५ श्री पूर्णमतिजी माताजीचे श्री. स. संघ सानिध्यात चमेली पार्क, तिलकनगर, इंदोर शहरात अस्टाहिक महापर्व आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात शांतिधारा पंचगव्य अनुसंधन केंद्र बीनाजी सागर, मध्य प्रदेश द्वारा मोफत आयुर्वेद पंचगव्य चिकित्सा शिबीर आयोजित केले होते. शिबिरात पाचोरा येथील आयुर्वेद पंच गव्य चिकित्सक डॉ. बन्सीलाल जैन यांनी रुग्ण तपासणी व मार्गदर्शन केले. शिबिरात कॅन्सर, बी. पी., मधुमेह, सोरिअसिस, किडनी, गुडघेदुखी सह विविध आजारांवर सुमारे ७५ रुग्णांनी लाभ घेतला.

Protected Content